नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शैक्षणिक साहित्याचे वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन भारताचे उत्तम, आदर्श नागरिक व्हावे संस्थापक अध्यक्ष मैत्री फाऊंडेशन नाशिक प्रशांत हेडाऊ यांचे प्रतिपादन.

मैत्री फाऊंडेशन नाशिक या सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

मैत्री फाऊंडेशन नाशिक ही सामाजिक संस्था सोबत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची सामाजिक संस्था आहे. ही संस्था इयत्ता पहिली पासून तर महाविद्यालयीन कॉलेजपर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक संस्था आहे. या सामाजिक संस्थेमार्फत दरवर्षी जळगाव जिल्हा आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. त्याचप्रमाणे गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. यावर्षी सुद्धा मैत्री फाऊंडेशन नाशिक या संस्थेने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी या शाळेतील एकूण ९६ विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची ६८ राजा पाटी, ९६ पेन्सिल, ९६ पेन,९६ पट्टी, ९६ एकेरी वही, ९६ दुरेघी वही,९६ चौरेघी वही, ९६ चौकटी वही याप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

मागील वर्षी सुद्धा या संस्थेने या शाळेला दोन लॅपटॉप, एक संगणक, बाल लायब्ररी साठी ३५० पुस्तके आणि पुस्तके ठेवण्यासाठी एक कपाट अशी मदत केली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच कैलास पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कांचन परदेशी, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती बन्सीलाल पाटील हे होते आणि या कार्यक्रमासाठी मैत्री फाउंडेशन नाशिकचे पदाधिकारी खजिनदार लीना पाचपांडे, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत हेडाऊ, संस्थेचे सभासद तथा एसआयडी ऑफिसर अनिल इंगळे, महेश राऊळ, प्रा.रवींद्र पाटील, किरण महाजन, शेखर चौधरी, रवींद्र धांडे, महेश पवार, विलास बाह्रे उपस्थित होते. या संस्थेला त्यांच्या सामाजिक सेवेबद्दल, कार्याबद्दल आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार अध्यक्ष महिला राज्य आयोग महाराष्ट्र राज्य रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले. प्रस्ताविक मीनाक्षी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या आभार मुख्याध्यापक भगवान बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षिका प्रीती फेगडे, शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनीस प्रमिला पाटील, देवका परदेशी यांनी परिश्रम घेतले.